आपल्या सिनेसृष्टीला अनेक दिग्गज कलाकार लाभले. त्यातीलच एक म्हणजे बालगंधर्व होय.
रवी जाधव यांनी चित्रपटाच्या माध्यमातून बालगंधर्व यांच्या आयुष्यातील विविध पैलू पडद्यावर उलगडले आहेत.
आज रवी जाधव दिग्दर्शित 'बालगंधर्व' या चित्रपटाला तब्बल १२ वर्षे पूर्ण झाली आहेत.
या चित्रपटात अभिनेता सुबोध भावेने अप्रतिम भूमिका साकारत प्रेक्षकांवर आपली छाप पाडली आहे.
या खास दिवसानिमित्त दिग्दर्शक रवी जाधव यांनी इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर करत एक मोठी घोषणादेखील केली आहे.
रवी जाधव यांनी लिहलंय, ''आज एक तप झाले "बालगंधर्व" हा माझा पहिला ‘बायोग्राफीकल’ चित्रपट प्रदर्शित होऊन जो आमच्या टिमच्या आणि प्रेक्षकांच्या सदैव स्मरणात राहील!!!''
त्यांनी पुढे लिहलय, ''उद्या तब्बल १२ वर्षांनी माझ्या दुसऱ्या ‘बायोग्राफीकल’ चित्रपट ‘मै अटल हूँ’ च्या चित्रीकरणाचा प्रारंभ होत आहे. असाच आशिर्वाद असावा!!!''