NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'मुख्य भूमिकेसाठी तुला माझ्यासोबत...'; प्रसिद्ध अभिनेत्रीकडे निर्मात्याने केली धक्कादायक मागणी

'मुख्य भूमिकेसाठी तुला माझ्यासोबत...'; प्रसिद्ध अभिनेत्रीकडे निर्मात्याने केली धक्कादायक मागणी

मनोरंजन विश्वात कास्टिंग काउच ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. याबाबत अनेक अभिनेत्रींनी आवाज उठवला आहे. नुकतेच 'शेरदील शेरगिल' चित्रपटातून टीव्ही जगतात पाऊल ठेवणारी अभिनेत्री आयशा कपूरने कास्टिंग काउचबाबतचा तिचा अनुभव शेअर केला आहे.

18

मनोरंजन विश्वात कास्टिंग काउच ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. याबाबत अनेक अभिनेत्रींनी आवाज उठवला आहे. नुकतेच 'शेरदील शेरगिल' चित्रपटातून टीव्ही जगतात पाऊल ठेवणारी अभिनेत्री आयशा कपूरने कास्टिंग काउचबाबतचा तिचा अनुभव शेअर केला आहे.

28

आयशा कपूरने 'शेरदील शेरगिल' या मालिकेद्वारे टीव्हीमध्ये पदार्पण केले. या मालिकेत ती निक्कीची भूमिका साकारताना दिसत आहे.

38

आयशाच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळत आहे.

48

मनोरंजनाच्या दुनियेत पदार्पण करण्यापूर्वी मुलीला कोणत्या परिस्थितीतून जावे लागते हे आयशाने उघड केले आहे.

58

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आयशा कपूरने खुलासा केला की, जेव्हा ती टीव्हीवर पदार्पण करण्यासाठी संघर्ष करत होती, तेव्हा निर्मात्यांनी कोणत्या प्रकारच्या मागण्या केल्या होत्या.

68

'हा प्रवास काही सोपा नव्हता. सुरुवातीला काही लोकांनी त्यांची खूप दिशाभूल केली. कुणी स्वत:ला कास्टिंगचा माणूस आणि संयोजक म्हणवून घ्यायचा. ती ऑडिशनला जायची तेव्हा खूप गोंधळून जायची. पुढे अशा बनावट लोकांपासून सुटका झाली', असं आयशाने सांगितलं.

78

आयशा म्हणाली, 'मला वेब सीरिजमध्ये चांगल्या भूमिकांच्या ऑफर आल्या, पण मला टीव्ही शो करायचे होते. वेब सीरिजमध्ये काम केल्यानंतर मला टीव्ही शो मिळाला. निर्मात्याने माझ्यासमोर एक अट ठेवली की जर मी त्याच्याशी लग्न केले तर मला ही मुख्य भूमिका मिळेल. मी त्या मालिकेचे शूटिंग सुरू केले होते मात्र निर्मात्याची ही अट मान्य न केल्यामुळे मला मालिकेतून काढण्यात आलं. मला कामाच्या दिवसांचा पगारही दिला गेला नाही'.

88

एखाद्या अभिनेत्याने आपल्या कामात पूर्ण झोकून देऊन मेहनत केली तर तो एक दिवस नक्कीच यशस्वी होतो, असा विश्वास आयशाने व्यक्त केला.

  • FIRST PUBLISHED :