बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावर दिसली नाही. आता ब्रेकनंतर ती 'चकदा एक्सप्रेस' या चित्रपटातून कमबॉक करत आहे.
ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाशी संबंधित अपडेट्स शेअर करत असते.
नुकतंच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी आणि फोटोला दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधलं असून याचीच जोरदार चर्चा रंगली आहे.
अनुष्काने इन्स्टाग्रामवर नो-मेकअप लुकमधील फोटो शेअर केले आहेत.
हे फोटो शेअर करत अनुष्काने लिहिलं, 'मला एकही फोटो आवडला नाही! म्हणून मला वाटले की नेहमी चांगला फोटो टाकावा, असे कोण म्हणाले? तर हे माझे ओके ओके टाईपचे फोटो आहेत, जे मी टाकणार नव्हते पण हे काढण्यासाठी माझा अनमोल श्वास वापरला गेला आहे. म्हणून पोस्ट करत आहे, ओके बाय'.
अनुष्काच्या या फोटोंवर अनेक कमेंटचा वर्षाव होत आहे.
अनुष्का शर्माच्या या फोटोंवर अर्जुन कपूरने मजेशीर प्रतिक्रिया दिली. 'हुडी चांगली दिसत आहे. फोटो खराब आहे हे मलाही मान्य आहे'.
रणवीर सिंहनेही फोटोवर हसायचं इमोजी दिलं आहे.