अनुष्का शर्मा आणि विराट कोहली आज त्यांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा करत आहेत.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीमध्ये विवाहबद्ध झाले. त्यांच्या संसाराला आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.
2013 मध्ये एका अॅड शूटच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. हळूहळू त्यांची मैत्री प्रेमात बदलली.
विरुष्का हे पॉवर कपलपैकी एक असून ते कायम चर्चेत असतात.
दोघेही गेल्या वर्षी एका मुलीचे पालक झाले आहेत. त्यांच्या मुलीचं नाव वामिका आहे.
अनुष्का विराटने आत्तापर्यंत त्यांची मुलगी वामिकाचा चेहरा लोकांसमोर दाखवला नाहीये.
तुम्हाला माहितीये का अनुष्का विराटपेक्षा वयाने मोठी आहे.
अनुष्काचा जन्म 1 मे 1988 रोजी झाला. तर विराट कोहलीचा वाढदिवस 5 नोव्हेंबर 1988 रोजी आहे. अशाप्रकारे अनुष्का तिचा पती विराट कोहलीपेक्षा 6 महिन्यांनी मोठी आहे.