बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सतत कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. अनुष्काची प्रोफेशनलच नव्हे तर पर्सनल लाईफदेखील चाहत्यांना फार आवडते.
अनुष्का शर्माने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अनुष्का कोवळ्या उन्हात न्हाऊन निघत आहे. सूर्यकिरणांमुळे अनुष्काचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे. अनुष्काच्या या फोटोंवर पती विराट कोहलीने हार्ट इमोजी शेअर केला आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अनुष्का काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फारच गोड दिसत आहे. तसेच फोटोमध्ये ती आपल्या केसांशी खेळताना दिसत आहे.
अनुष्काच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून प्रत्येकजण तिच्यावर फिदा होत आहे. अनुष्काने हे फोटो शेअर करताच ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
अनुष्का सतत विराट आणि वामिकासोबत वेळ घालवताना दिसून येते. या तिघांना सोशल मीडियावर प्रचंड पसंत केलं जातं.
अनुष्का शर्मा जितकी सुंदर आहे तितकीच ती फिटनेसच्या बाबतीत सजग आहे. आपल्या प्रेग्नेंसी काळातसुद्धा अनुष्का एक्सरसाइज करताना दिसून आली होती.
अनुष्का एका मुलीची आई असूनसुद्धा अतिशय फिट आहे. ती सोशल मीडियावर फारच ऍक्टिव्ह असते.