बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि संगीतकारांपैकी एक अशी अनु मलिक यांची ओळख आहे. आज पर्यंत त्यांनी इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत.
अनु मलिक नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. ते सतत विविध शोमध्ये परीक्षण करतांना दिसून येतात.
परंतु आज अनु मलिक एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. आणि हे कारण म्हणजे त्यांची लेक अदा मलिक होय.
अदा मलिक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
अदा मालिका कोणत्याही अभिनेत्रींपेक्षा कमी नाहीय. सौंदर्य आणि फिटनेसच्याबाबतीत ती अभिनेत्रींना टक्कर देते.
परंतु अदा मलिक आपल्या वडिलांसारखं गायन क्षेत्रात किंवा अभिनय क्षेत्रात सक्रिय नाहीय.
अदाला लहानपणासूनच क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे आज ती एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे.
अदा मलिकने अनेक मोठं-मोठ्या सेलेब्रेटींसाठी ड्रेस डिझाईन केले आहेत.