आशिकी या चित्रपटातून नावारुपास आलेली अनु अग्रवाल ही 90 च्या दशकातील एक लोकप्रिय अभिनेत्री अभिनेत्री होती. ती दिसायला इतकी सुंदर होती की चाहते तिला चक्क स्वप्नसुंदर असं म्हणायचे.
मॉडलिंगमधून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पॅरिसमधील सौंदर्य स्पर्धा जिंकल्यामुळे ती पहिल्यांदा प्रकाशझोतात आली होती.
1990 साली आशिकी या चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तिचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला. यामुळे ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. तिच्यासमोर निर्मात्यांच्या जणू रांगाच लागल्या होत्या.
परंतु तिचं हे फेम दिर्घकाळ टिकलं नाही. 1999 साली तिचा भीषण कार अपघात झाला. यामुळे 29 दिवस ती कोमात होती. सुदैवानं ती या अपघातातून वाचली परंतु तिचा चेहरा मात्र खराब झाला होता.
बरं झाल्यानंतर तिनं काही प्लास्टिक सर्जरी केल्या मात्र तरीही तिचा चेहरा पहिल्यासारखा सुंदर काही होऊ शकला नाही.
परिणामी कधीकाळी तरुणांच्या हृदयावर राज्य करणारी अनु सध्या अज्ञातवासात आयुष्य जगत आहे.