रंगांचा हा सण होळी आपल्यासोबत आनंदाचे, उत्साहाचे अनेक रंग घेऊन येतो. आणि यावेळी हा रंगोत्सव अनेक टीव्ही सेलिब्रिटींसाठी खूप खास असणार आहे. गेल्या वर्षभरापासून अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली आहे. हे सेलिब्रिटी लग्नानंतरची पहिली होळी साजरी करणार आहेत. या सेलिब्रिटींमध्ये मौनी रॉय-सूरज नांबियार, अंकिता लोखंडे-विकी जैन ते करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरापर्यंत अनेक लोकप्रिय जोडप्यांचा समावेश आहे.
'गुम है किसी कै प्यार मैं' या मालिकेतील मुख्य कलाकार असणाऱ्या ऐश्वर्या शर्मा आणि निल भट्ट यांनी लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर त्याची पहिलीच होळी आहे.
बिग बॉस फेम करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरा हे दोघे या वर्षी फेब्रुवारीमध्ये विवाहबद्ध झाले आहेत. लग्नानंतर दोघे पहिल्यांदा एकत्र होळी साजरी करणार आहेत.
'पवित्र रिश्ता' फेम लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचा विवाह गेल्या वर्षी १४ डिसेंबरला झाला होता. लग्नानंतर दोघांनी नवीन वर्ष, ख्रिसमस, मकर संक्रांत असे अनेक सण साजरे केले. आता दोघेही पहिल्यांदाच एकत्र होळी साजरी करणार आहेत.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये श्रद्धा आर्या आणि राहुल नागलचे लग्न झाले होते. लग्नानंतर श्रद्धाचा पती लगेचच आपल्या कामावर परतला होता. तो भारतीय नौदलात आहे. श्रध्दा आणि राहुल हे लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांना एकत्र होळी साजरी करताना पाहणं त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट असेल.
राहुल वैद्य आणि दिशा परमार हे टीव्हीचे सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये दोघांचा विवाहसोहळा पार पडला होता. आतापर्यंत या दोघांनी दिवाळी, मकर संक्रांती हे सण एकत्र साजरे केले आहेत. आता दोघेही लग्नानंतर पहिल्यांदा एकत्र होळी साजरी करणार आहेत.
टीव्ही अभिनेत्री सायंतानी घोष आणि अनुराग तिवारी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विवाहबंधनात अडकले होते. दोघांनी कोलकत्ता येथे अगदी खाजगी पद्धतीने लग्न केले होते. लग्नानंतर दोघांची ही पहिली होळी आहे.