मनोरंजनसृष्टीत सध्या अनेक कलाकार गुड न्यूज देताना दिसून येत आहेत. सोनम कपूर, आलिया भट्ट, बिपाशा बसू या अभिनेत्री लवकरच आई बनणार आहेत. दरम्यान आता अभिनेत्री अंकिता लोखंडे आई बनणार असल्याचं म्हटलं जात आहे.
अंकिता लोखंडेचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री पती विकी जैनसोबत ग्लॅमरस पोज देताना दिसून येत आहे.
या फोटोंमध्ये अंकिताने निळ्या रंगाचा वेस्टर्न डीप नेक गाउन परिधान केला आहे.
अंकिता फोटोंमध्ये बोल्ड आणि ब्युटीफुल दिसत आहे यात काहीच शंका नाही. परंतु या फोटोंमुळे ऐक वेगळीच चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
अभिनेत्रीला या वेस्टर्न ड्रेसमध्ये पाहून ती आपलं बेबी बम्प लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
चाहत्यांचं म्हणणं आहे कि या फोटोंमध्ये अंकिताचा बेबी बम्प दिसून येत आहे. त्यामुळे ती लवकरच गुड न्यूज जाहीर करु शकते असाही अंदाज वर्तवला जात आहे.
परंतु अंकिता आणि विकी जैनने याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीय.
अंकिता लोखंडे आणि विकी जैनने 14 डिसेंबर 2021 मध्ये लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला 6 महिने पूर्ण झाली आहे.