NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / ‘तुझ्यामुळं मुस्लीम स्त्रियांचं नाव खराब होतं’; अंजुम फकीह बिकिनी फोटोंमुळं होतेय ट्रोल

‘तुझ्यामुळं मुस्लीम स्त्रियांचं नाव खराब होतं’; अंजुम फकीह बिकिनी फोटोंमुळं होतेय ट्रोल

‘मुस्लीम असूनही बिकिनी घालतेस?’ अंजुम फकीहचे नवे फोटो पाहून नेटकरी संतापले

110

कुंडली भाग्य या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अंजुम फकीह ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध म्हणून ओळखली जाते.

210

मालिकांसोबत ती आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळं देखील कायम चर्चेत असते.

310

तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओज नेहमीच सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेतात.

410

मात्र रुपेरी पडद्यावर सोज्वळ सुनेची भूमिका साकारणाऱ्या अंजुमनं यावेळी पोस्ट केलेले फोटो पाहून काही नेटकरी संतापले आहेत.

510

सध्या ती मालिकेच्या चित्रीकरणाच्या निमित्तानं गोव्यात आहे. तिथं तिनं एक बिकिनी फोटोशूट केलं.

610

अन् हे फोटो इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले. मात्र तिचा तो बिकिनी अवतार पाहून काही मुस्लीम नेटकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत.

710

मुस्लीम असुनही असे बिकिनीमधील फोटोशूट कसे काय करतेस? मालिकेत सोज्वळ दिसतेस पण खऱ्या आयुष्यात फार शेफारलेली आहेस अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत तिच्यावर संताप व्यक्त केला जात आहे.

810

अंजुमला तिच्या बोल्ड फोटोंमुळं यापूर्वी देखील अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

910

काही महिन्यांपूर्वी केलेल्या एका इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटमध्ये तिनं आपल्या ट्रोलर्सला एका सल्ला दिला होता. जर तुम्हाला माझे फोटो आवडत नसतील तर त्याकडे दुर्लक्ष करा तुमच्या कमेंट्सचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही.

1010

यावेळी देखील तिनं अशाच प्रकारे टीकाकारांकडे दुर्लक्ष केलंय व स्तुती करणाऱ्या चाहत्यांच्या कमेट्सवर धन्यवाद म्हणत त्यांना महत्व दिलं आहे.

  • FIRST PUBLISHED :