NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / अँजेलिना जोली खऱ्या प्रेमाच्या शोधात; 3 लग्न 8 बॉयफ्रेंड, मात्र तरी विश्वसुंदरी पडली एकटी

अँजेलिना जोली खऱ्या प्रेमाच्या शोधात; 3 लग्न 8 बॉयफ्रेंड, मात्र तरी विश्वसुंदरी पडली एकटी

अँजेलीना जोली का पडली एकटी? जाणून घ्या अभिनेत्रीच्या आयुष्यातील काही थक्क करणाऱ्या गोष्टी

110

अँजेलिना जोली ही जगप्रसिद्ध अभिनेत्री आहे. जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणून तिचं कौतुक केलं जातं. (Angelina Jolie/Instagram)

210

आज अँजेलिनाचा वाढदिवस आहे. 46 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं जगभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Angelina Jolie/Instagram)

310

अँजेलिना तिच्या अफाट सौंदर्यासोबतच खासगी आयुष्यातील काही घटनांमुळं देखील कायमच चर्चेत राहिली आहे. आज आम्ही तुम्हाला अँजेलिनाच्या आयुष्याशी निगडीत अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यांबद्दल तुम्हाला फारसे माहित नसेल. (Angelina Jolie/Instagram)

410

अँजेलिना लहानपणी फारच हट्टी स्वभावाची होती. या हट्टीपणामुळं तिला शाळेतून देखील काढून टाकण्यात आलं होतं. तिनं पाच वेगवेगळ्या शाळांमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. (Angelina Jolie/Instagram)

510

अँजेलिना आज जगातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. पण खरं तर तिला अभिनेत्री व्हायचंच नव्हतं. तिला चक्क फ्यूनरल डायरेक्टर व्हायचं होतं. म्हणजे अशी व्यक्ती जी शवघरांत मृत शरीरांची देखरेख करते. (Angelina Jolie/Instagram)

610

तिनं 1995 साली ‘हॅकर्स’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात तिनं अभिनेता जॉनी लीच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. (Angelina Jolie/Instagram)

710

याच चित्रपटादरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. आणि त्यांनी लग्न केलं. मात्र दोघांचं लग्न दिर्घ काळ टिकलं नाही. परिणामी अँजेलिनाने बिली बॉबसोबत दुसरं लग्न केलं. मात्र त्यालाही घटस्फोट देऊन मग तिनं ब्रॅड पीटसोबत तिसरं लग्न केलं. (Angelina Jolie/Instagram)

810

पुढे ब्रॅडला देखील तिनं घटस्फोट दिला. अन् आता ती अमेरिकन व्यवसायिक फिलेन्थ्रॉपिस्टसोबत चौथं लग्न करण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. (Angelina Jolie/Instagram)

910

लक्षवेधी बाब म्हणजे अँजेलीनाने अधिकृतरित्या तीन लग्न तर केलीच पण दरम्यानच्या काळात तिचे आठ बॉयफ्रेंडदेखील होऊन गेले आहेत. परंतु तरी देखील अँजेलिना सध्या एकटीच आहे. (Angelina Jolie/Instagram)

1010

“आयुष्यात सर्वकाही मिळालं. पैसे, प्रसिद्धी, लोकप्रियता अगदी वाट्टेल ते करण्याचं स्वातंत्र्य परंतु खरं प्रेम कधीही मिळालं नाही.” अशी खंत तिनं जिमी किम्मेलला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली होती. (Angelina Jolie/Instagram)

  • FIRST PUBLISHED :