बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण अलाना पांडे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तत्पूर्वी तिच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. सांगायचं झालं तर ही अनन्याची चुलत बहीण आहे. म्हणजेच अलाना चंकी पांडे यांच्या मोठ्या भावाची मुलगी आहे.
अलानाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमामध्ये अनन्या आपल्या भावासोबत दिसून आली.यावेळी अनन्याने भाऊ अहान पांडेसोबत मीडियाला सुंदर पोझही दिल्या.
अलाना पांडे ही एक मॉडेल असण्यासोबतच सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर आहे. तर तिचा बॉयफ्रेंड आयव्हर हा फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हळदीचा समारंभ घरीच होणार असून लग्न ताज पॅलेसमध्ये होणार आहे.
2021 मध्ये या जोडप्याने मोठ्या थाटामाटात साखरपुडा उरकला होता. दोघेही अमेरिकेत एकत्र राहतात.
येत्या 16 मार्चला हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे.
अनन्याबद्दल बोलायचं झालं तर, ती लवकरच आयुष्मान खुरानासोबत 'ड्रीम गर्ल 2' मध्ये दिसणार आहे.
राज शांदिल्य दिग्दर्शित हा चित्रपट ७ जुलै २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.