3 सप्टेंबर पासून जवळपास 5 वर्षांनंतर 'झलक दिखला जा'चा नवा सीजन सुरु झाला आहे. या शोमध्ये एकापेक्षा एक सेलिब्रिटी डान्सर आहेत. तसेच माधुरी दीक्षितसोबत करण जोहर आणि नोरा फतेही या सीजन 10 चे परीक्षक आहे. आज आपण या सेलिब्रेटी स्पर्धकांच्या मानधनाबाबत जाणून घेणार आहोत.
बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, 'अनुपमा' फेम पारस कलनावत या शोच्या एका एपिसोडसाठी 50 हजार रुपये मानधन घेत आहे.
'द कपिल शर्मा शो' फेम दादी अर्थातच अभिनेता अली असगर शोच्या एका एपिसोडसाठी तब्बल 2 लाख रुपये आकारत आहे.
अभिनेता धीरज धुपर एका एपिसोडसाठी 2.5 लाख रुपये घेत आहे.
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर एका एपिसोडसाठी 1 लाख रुपये मानधन घेत आहे.
तर नीती टेलर एका एपिसोडसाठी जवळपास 1.5 लाख रुपये घेत आहे.
टीव्हीवरील बोल्ड अभिनेत्री निया शर्मा एका एपिसोडसाठी 2.5 लाख रुपये घेत आहे.
अंगुरी भाभी फेम शिल्पा शिंदे एका एपिसोडसाठी 5 लाख रुपये घेत असल्याचं म्हटलं जात आहे.
तर बॉस लेडी म्हटली जाणारी रुबिना दिलैक एका एपिसोडसाठी तब्बल 7 लाख रुपये घेत आहे.
टिकटॉक स्टार फैजल शेखने सर्वात जास्त मानधन घेतल्याचं सांगितलं जात आहे. रिपोर्टनुसार, फैजल एका एपिसोडसाठी तब्बल 10 ते 11 लाख रुपये घेत असल्याचं सांगितलं जात आहे.