'चंद्रा' अर्थातच अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत काही ना काही शेअर करत असते.
अमृता नेहमीच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या कुटुंबासोबतचेही फोटो शेअर करत असते.
नुकतंच अमृता खानविलकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये अभिनेत्री एका गोड अशा चिमुकल्या मुलासोबत पोज देताना दिसून येत आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तर हा मुलगा कोण असा अनेकांना प्रश्न पडला आहे. तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो हा चिमुकला अमृताचा भाचा आहे.
अमृताचा भाचा आपल्या आईसोबत विदेशात असतो त्याचं नाव निर्वान असं आहे.
आज त्याचा वाढदिवस आहे. त्यामुळे अमृताने त्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
सोबतच आजी आणि मावशीचं त्याच्यावर किती प्रेम आहे हेदेखील सांगितलं आहे.