'पुष्पा'च्या माध्यमातून साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन जगभरात लोकप्रिय झाला आहे. अल्लू अर्जुनने आपल्या डायलॉग्स आणि हुक स्टेपने सर्वानांच वेड लावलं आहे. परंतु तुम्हाला माहितेय का, अल्लू अर्जुनची संपूर्ण फॅमिलीच सेलिब्रेटी आहे आणि फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहे. अल्लूच्या फॅमिलीत जवळपास सगळेच सुपरस्टार आहेत.
अल्लू अर्जुनचे आजोबा अल्लू रामलिंगय्या 1000 हून अधिक टॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसले आहेत. त्यांना 1990 मध्ये पद्मश्री आणि 2001 मध्ये रघुपती व्यंकय्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ते एक प्रसिद्ध अभिनेता आणि विनोदी अभिनेता होते.
अल्लू अर्जुनचे वडील अरविंद हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. अल्लू अरविंद हे अत्यंत प्रतिष्ठित चित्रपट निर्माता असून त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
मोठा भाऊ अल्लू अर्जुन प्रमाणेच अल्लू शिरीष हे देखील साउथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. 2013 मध्ये रिलीज झालेल्या 'गौरवम' या चित्रपटातून त्याने पदार्पण केलं होतं. यानंतर त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणचे भारतातच नव्हे जगभरात प्रचंड चाहते आहेत. ऑस्कर विजेत्या 'RRR' चित्रपटामुळे तो प्रचंड चर्चेत आला होता. तो अभिनेता अल्लू अर्जुनचा चुलत भाऊ आहे. तसेच राम चरण हा चिरंजीवीचा मुलगा आहे.
पवन कल्याण हा साऊथचा सुपरस्टार चिरंजीवीचा भाऊ आहे आणि तो स्वतः साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा एक लोकप्रिय अभिनेता आणि नेता आहे. 'अक्काडा अममयी इक्कडा अब्बे' या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. हा चित्रपट 1996 मध्ये प्रदर्शित झाला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
अल्लू अर्जुनचे काका चिरंजीवी यांना दोन भाऊ आहेत. पवन कल्याण, जो एक अभिनेता आहे आणि नागेंद्र बाबू, जो एक अभिनेता आणि निर्माता आहे. नागेंद्र बाबू यांचा मुलगा वरुण तेज हा देखील साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे.
निहारिका कोनिडेला ही अल्लू अर्जुनची चुलत बहीण आहे. ती नागेंद्र बाबू यांची मुलगी आणि वरुण तेजची सख्खी बहीण आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, ती टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्येदेखील काम करते. निहारिकाने 2016 मध्ये अभिनय जगातात प्रवेश केला होता. आणि तिने 2020 मध्ये चैतन्य जेव्हीशी लग्न केलं आहे. अल्लू अर्जुनचे काका चिरंजीवीच्या बहिणीचे नाव विजय दुर्गा आहे. अभिनेता साई धरम तेजा हा तिचा मुलगा आहे आणि ती स्वतः देखील एक अभिनेत्री आहे.