अभिनेत्री आलिया भट्ट बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आलियाने फारच कमी वयात हे यश मिळवलं आहे.
आलियाने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे. तिने अनेक दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मन जिंकलं आहे.
आत्ता पुन्हा एकदा आलिया भट्ट चाहत्यांचं मन जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. आलिया लवकरच आपल्या 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटातून रसिकांच्या भेटीला येणार आहे.
बहुचर्चित 'गंगूबाई काठियावाडी'ची रिलीज डेट अखेर जाहीर करण्यात आली आहे. नुकताच आलियाने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत हा चित्रपट ६ जानेवारी २०२२ ला रिलीज होणार असल्याचं म्हटलं आहे.
चाहत्यांना अनेक दिवसांपासून या चित्रपटाची उत्सुकता लागी होती. आज अखेर रिलीज डेट जाहीर करत चाहत्यांना थोडासा दिलासा दिला आहे.
आलिया भट्टने यामध्ये पुन्हा एकदा स्त्री केंद्रित दमदार भूमिका साकारली आहे. त्यामुळे हा चित्रपट पडद्यावर किती यशस्वी ठरतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.