Alia Bhatt Successful actress: आलिया भट्ट बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रीपैकी एक आहे. अभिनेत्री सोनी राजदान आणि निर्माता महेश भट्टा यांची मुलगी आलियानं अभिनयाच्या जीवावर बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या मुलीला यशाच्या शिखरावर पाहणं याहून मोठं सुख काहीच असू शकत नाही. आलिया देखील बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे.
आलिया भट्टच्या ‘गंगूबाई कठियावाड़ी’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाल प्रचंड यश मिळालं. आता बॉलिवूडनंतर आता आलिया हॉलिवूडमध्ये देखीलल आपल्या अभिनयाचा डंका वाजवायला सज्ज झाली आहे.
आलिया यशस्वी अभिनेत्री तर आहेच पण ती एक बिजनेसवुमन देखील आहे. महेश भट्टा यांना देखील आलियाचा अभिमान वाटतो. न्यूज 18 हिंदी शी बोलताना महेश भट्ट म्हणाले की, माझी मुलगी माझ्यापेक्षाही जास्त यशस्वी आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. (फोटो साभार: aliaabhatt/maheshfilm/Instagram )
यावेळी महेश भट्ट म्हणाले की, आलियाला बालपणापासून स्टार बनायचं होतं. ती आमचा आधार घेऊन बॉलिवूडमध्ये आली नाही तर ती स्वताच एक आग आहे. माझी मुलगी माझ्यासाठी एक चमत्कारच असल्याचे देखील त्यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले की, आलियानं नेहमीच आत्मविश्वासानं आणि फोकस्ड असं काम केलं आहे. तिनं आज जे यश मिळवलं आहे, ते पाहून महेश भट्ट खूश आहेत.
तसेच आलिया मुलगी झाल्यानंतर मला खूप आनंद झाला आहे. माहितीसाठी सांगतो कीस 2019 मध्ये फोर्ब्सच्या सर्वात जास्ता कमाई करणाऱ्या 100 सेलिब्रिटीच्या यादीत आलियाचा देखील समावेश होता.
आलिया एक यशस्वी अभिनेत्री आहे. शिवाय रणबीर कपूरची पत्नी आणि कपूर परिवाराची सुन तेसच तिला एक मुलगी देखील आहे. याशिवाय ती एक बिजेनसवुमन देखील आहे.
आलिया भट्टने 2021 साली तिचं प्रोडक्श हाऊस सुरू केलं आहे. मीडिया रिपोर्टसनुसार आलिया भट्टचं नेटवर्थ 180 कोटी इतक आहे. (फोटो साभार; aliaabhatt/Instagram)