आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या लग्नाबाबत सध्या चर्चा सुरू आहे. काहीच दिवसात हे कपल लग्नबेडीत अडकेल अशी माहिती समोर आली आहे. पण तुम्हाला माहित आहे की आलिया देखील अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) यांच्याप्रमाणे भारतीय नाही आहे.
आलिया भट्ट (Alia Bhatt) अशी अभिनेत्री आहे, जिने अगदी कमी वेळात बॉलिवूडमध्ये जम बसवला आहे. तिने तिच्या वयानुसार छोट्याशा करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका केली आहे. अलीकडेच तिने एसएस राजमौली यांचा सुपरहिट आणि बॉक्स ऑफिसवर कमाल करणारा सिनेमा आरआरआरमध्ये दिसली होती. (फोटो सौजन्य- @rrrmovie/Instagram)
बॉलिवूडमध्ये जिचा डंका आहे, अशी या अभिनेत्रीकडे भारतीय नागरिकत्व नाही आहे. तिच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. त्यामुळे भारतातील मतदान प्रक्रियेमध्येही तिला मत देण्याचा अधिकार नाही आहे (फोटो सौजन्य- @aliaabhatt/Instagram)
ब्रिटिश नागरिकत्वाबाबत तिचे वडील महेश भट्ट यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते. कारण आलियाची आई म्हणजेच सोनी राजदान मूळच्या ब्रिटिश आहेत. तिचा जन्म बर्मिंगहॅम याठिकाणी झाला. त्यामुळे आलियाला ब्रिटिश नागरिकत्व मिळाले आहे. (फाइल फोटो.)
आलियानेही एकदा भारतीय नागरिकत्व नसल्याची खंत व्यक्त केली होती. ती म्हणाली होती- 'दुर्दैवाने मी मतदान करू शकत नाही कारण माझ्याकडे ब्रिटिश पासपोर्ट आहे'. (फोटो सौजन्य- @aliaabhatt/Instagram)
अलीकडेच कमाल आर खानने आलियाच्या नागरिकत्वावर तोंडसुख घेतले होते. त्याने ट्वीटमध्ये असे म्हटले होते की, 'जर मी एका तासासाठीही पंतप्रधान झालो, तर माझे पहिले काम अक्षय कुमार, आलिया भट्ट आणि जॅकलिन फर्नांडिस यांना देशाबाहेर काढून त्यांच्या देशात पाठवणे असेल.'
अक्षय कुमारने अनेक वर्षांपूर्वी भारतीय नागरिकत्व सोडून कॅनडाचे नागरिकत्व घेतले होते. अशा परिस्थितीत भारतीय कायद्यानुसार अक्षय हा भारतीय नागरिक नाही किंवा त्याला येथे मतदान करण्याचा अधिकार नाही. त्याचबरोबर जॅकलिन फर्नांडिसकडे श्रीलंकेचे नागरिकत्व आहे. जॅकलिनचे वडील श्रीलंकेचे तर आई मलेशियाची आहे. 2006 मध्ये जॅकलिनने मिस युनिव्हर्ससाठी श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले होते. (फाइल फोटो)
भारतात दुहेरी नागरिकत्वाची तरतूद नाही, त्यामुळे रणबीर कपूरसोबत लग्न केल्यानंतर आलिया भारतीय नागरिकत्व मिळवणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे
आलिया आणि अक्षय व्यतिरिक्त बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. इम्रान खान, सनी लिओन, कतरिना कैफ, दीपिका पदुकोण, नर्गिस फाखरी यांच्याकडे देखील परदेशी नागरिकत्व आहे