लग्नानंतर अली फजल आणि रिचा चड्ढाने लगेचच ग्रँड रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी उपस्थिती लावत नव दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
या जोडप्याने मुंबईत आपल्या सेलिब्रेटी मित्रांसाठी ग्रँड वेडिंग रिसेप्शन ठेवलं होतं. ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. कार्यक्रमापूर्वी अली आणि रिचाने कॅमेऱ्यांसमोर पोजही दिल्या.
नववधू अभिनेत्री रिचाने यावेळी रंगीबेरंगी गाऊन परिधान केला होता. तर अली सूट-बूटमध्ये देखणा दिसत होता.
दरम्यान या जोडप्याने अगदी रोमँटिक अंदाजात हातात हात पकडून कॅमेऱ्याला पोज दिल्या.
बॉलिवूड अभिनेता आणि 'मसान'मध्ये रिचाचा सहकलाकार असलेला विकी कौशलही रिसेप्शन पार्टीत पोहोचला होता. यावेळी त्याला एकट्याला पाहून लोकांनी कतरिना कुठं असल्याच्या कमेंट्सहि फोटोवर केल्या आहेत.
गर्लफ्रेंड सबा आझादसोबत अभिनेता हृतिक रोशनही अली फजल आणि रिचा चढ्ढा यांच्या आनंदात सहभागी झाला होता.
आशुतोष राणा पत्नी रेणुका शहाणेसोबत अली फजल आणि रिचा चढ्ढा यांच्या रिसेप्शनला पोहोचले होते.
अली आणि रिचा यांच्या लग्नाच्या विधी नवी दिल्ली आणि लखनऊ येथे पार पडल्या. ज्यात त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.