NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / अक्षय कुमारचा भारतीय सैन्यासोबत भांगडा; शाळेला तब्बल 1 कोटींची मदत

अक्षय कुमारचा भारतीय सैन्यासोबत भांगडा; शाळेला तब्बल 1 कोटींची मदत

अक्षय कुमारनं पुन्हा दाखवला मनाचा मोठेपणा; काश्मिरमधील लोकांना केली आर्थिक मदत

110

बॉलिवूडचा मिस्टर खिलाडी अक्षय कुमार सध्या काश्मीरमध्ये पोहोचला आहे.

210

त्यानं काश्मिरमध्ये जाऊन भारतीय सैन्य दलाच्या सैनिकांशी भेट घेतली.

310

या भेटीदरम्यान अक्षयनं काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील नीरू गावात शाळा बांधण्यासाठी एक कोटी रुपयांची देणगीही दिली आहे.

410

सर्वप्रथम त्यानं गुरेझ सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळील नीरू गावाला भेट दिली.

510

गावाला भेट दिल्यानंतर त्यानं तेथील शाळेचं निरिक्षण केलं. ही शाळा अत्यंत वाईट स्थितीत होती.

610

त्यामुळं शिकणाऱ्या मुलांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. त्यामुळं शाळेची पुर्नबांधणी करण्यासाठी त्यानं एक कोटी रुपयांची देणगी दिली.

710

सोबतच भविष्यात इतरही वस्तुंसाठी शाळेला आर्थिक मदत करण्याचं वचन त्यानं दिलं आहे.

810

शाळेनंतर त्यानं भारतीय सैन्य दलाच्या इतर सैनिकांची भेट घेतली.

910

जवळच बीएसएफचे युनिटची पोस्ट आहे, तिथे अक्षयने भारतीय सैनिक आणि स्थानिक लोकांसह जोरदार भांगडाही केला.

1010

ही क्षणचित्र BSF च्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आली आहे. दरम्यान या मदतीसाठी अक्षयच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

  • FIRST PUBLISHED :