NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / अनेक संकटांवर मात करुन हे सेलिब्रेटी आले एकत्र, रिअल लाइफमध्येही फिल्मी आहे लव्हस्टोरी

अनेक संकटांवर मात करुन हे सेलिब्रेटी आले एकत्र, रिअल लाइफमध्येही फिल्मी आहे लव्हस्टोरी

नुकताच अभिनेता अर्जुन रामपालनं त्याचा 21 वर्षांचा संसार मोडत बायकोशी काडीमोड घेतला. पण बॉलिवूडमध्ये काही कपल्स अशी सुद्धा आहेत ज्यांनी अनेक संकटानंतरही एकमेकांचा हात सोडला नाही.

  • -MIN READ

    Last Updated: November 22, 2019, 07:08 IST
17

बॉलिवूडमध्ये लिंकअप-ब्रेकअप या गोष्टी काही नवीन नाहीत. नुकताच अभिनेता अर्जुन रामपालनं त्याचा 21 वर्षांचा संसार मोडत बायकोशी काडीमोड घेतला. पण बॉलिवूडमध्ये काही कपल्स अशी सुद्धा आहेत ज्यांनी अनेक संकटानंतरही एकमेकांचा हात सोडला नाही.

27

अजय देवगण- काजोलः अजय देवगण अबोल आहे तर काजोलला सतत बोलायला २४ तासही कमी पडतील. दोघांची पहिली भेट सिनेमाच्या सेटवर झाली होती. तेव्हा काजोलला अजय फार गर्विष्ठ वाटला होता. काही दिवसांनी तिला कळलं की तो गर्विष्ठ नसून फार बोलत नाही. कालांतराने दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.

37

गौरी- शाहरुख खानः गौरी आणि शाहरुखमध्ये भांडण झालं होतं. त्याच्यावर रागावूनच गौरी मुंबईत आली होती. गौरीच्या मागे मागे शाहरुखही मुंबईत आला. गौरी आणि शाहरुखचं लग्न तेव्हा झालं जेव्हा शाहरूखकडे काहीही नव्हतं. गौरीचे वडील या लग्नासाठी तयार नव्हते. फिल्मी अंदाजात दोघांनी लग्न केलं आणि आजपर्यंत हे लग्न टिकून आहे.

47

दीपिका- रणवीर सिंग- बॉलिवूडमधील सर्वात हॉट कपल म्हणून या दोघांकडे पाहिले जाते. गेल्यावर्षी रणवीर- दीपिकाने लग्न केलं. दोघांनी सहा वर्ष एकमेकांना डेट केलं. दीपिका ब्रेकअपमुळे नैराश्यग्रस्त होती. याच काळात तिची भेट रणवीरशी झाली. रणवीरचंही त्या काळात ब्रेकअप झालं होतं. मात्र त्यानंतरही दोघांनी एकमेकांची साथ कधी सोडली नाही.

57

ऐश्वर्या- अभिषेक बच्चनः सलमान खानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या पूर्णपणे तुटली होती. तर करिश्मा कपूरसोबतचं अभिषेकचं लग्न मोडलं होतं. अशा परिस्थितीत जेव्हा दोघं भेटले तेव्हा अगदी थोड्याच काळात दोघांनी एकमेकांचा स्वीकार केला. अमेरिकेत एका हॉटेलच्या बाल्कनीत अभिषेकने खोटी अंगठी घालून ऐश्वर्याला प्रपोज केलं होतं. ऐश्वर्यानेही लगेच होकार दिला होता.

67

नेहा- अंगद बेदीः बॉलिवूडमधील पावरफूल कपल्समध्ये या दोघांचा उल्लेख आवर्जुन केला जातो. दोघांनी इतक्या घाईत लग्न केलं की इतरांना श्वास घेण्याची संधीही दिली नाही. दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत्या पण यात दोघं इतक्या लवकर लग्न करतील याची अपेक्षा कोणालाही नव्हती. लग्नाआधी गरोदर राहिल्यामुळे दोघांना हा निर्णय घ्यावा लागला होता. यावर्षी नेहाने मुलीला जन्म दिला. नेहा आणि अंगदने मुलीचं नाव मेहर असं ठेवलं.

77

ट्विंकल- अक्षय कुमार- आता या दोघांबद्दल काय बोलावं. दोघं एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत, तरीही त्यांना एकत्र पाहिलं की यांच्याहून परफेक्ट कपल असूच शकत नाही असं म्हटलं जातं. एकेकाळी अक्षय बॉलिवूडमधला ‘कॅसिनोव्हा’ होता. अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं लिंकअप होतं. मात्र ट्विंकलला भेटल्यानंतर त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं.

  • FIRST PUBLISHED :