बॉलिवूड कलाकारांप्रमाणे स्टारकिड्ससुद्धा सध्या चर्चेत असतात. यातीलच एक नाव म्हणजे बच्चन कुटुंबाची लेक आराध्या बच्चन होय.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आणि अमिताभ बच्चन यांची लाडकी नात आराध्या सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
दरम्यान आता आराध्याबाबत एक चकित करणारी गोष्ट समोर आली आहे. सांगायचं तर बच्चन कुटुंबाने आपल्या लेकीसाठी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आराध्या बच्चनबाबत एका वेबसाईटवर एक अफवा पसरवण्यात आली होती.
आराध्या बच्चनला आरोग्याविषयक काही समस्या असल्याचं यामध्ये सांगण्यात आलं होतं.
परंतु या केवळ अफवा आहेत असं सांगत अफवा पसरवण्याच्या आरोपाखाली कारवाई करण्यात यावी अशी मागणी बच्चन कुटुंबाने केली आहे.
परंतु अद्याप बच्चन कुटुंबाने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीय.
आज २० एप्रिलला या प्रकरणात सुनावणी होणार असल्याचं समोर आलं आहे.
आराध्या बच्चन सध्या इयत्ता सहावीच्या वर्गात आहे.
ती मुंबईतील धीरुभाई अंबानी शाळेची विद्यार्थिनी आहे.