‘अग्गबाई सासूबाई’ (Aggabai Sunbai) ही छोट्या पडद्यावरील सध्याच्या सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी म्हणून ओळखली जाते. (Uma Pendharkar/instagram)
या मालिकेचा सिक्वेल आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी मालिकेचं नाव ‘अग्गबाई सूनबाई’ असं असणार आहे. (Uma Pendharkar/instagram)
‘अग्गबाई सूनबाई’ या मालिकेत शुभ्रा या व्यक्तिरेखेसाठी अभिनेत्री ‘उमा पेंढारकर’ हिची निवड करण्यात आली आहे. (Uma Pendharkar/instagram)
या फोटो गॅलरीत आपण मुळात एक ‘काऊंसिलर’ असलेल्या उमाचा ‘अग्गबाई सूनबाई’पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास पाहुया. (Uma Pendharkar/instagram)
उमाचं बालपण डोंबिवली येथे गेलं. त्यामुळं अनेकदा तिला डोंबिवलीकर असंही म्हटलं जाते. तिनं ज्योती शिधये यांच्याकडून कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं होतं. (Uma Pendharkar/instagram)
अद्वैत दादरकरचे आई-बाबा शुभदा आणि श्रीकांत दादरकर यांच्याकडे तिनं नाट्यसंगीताचा डिप्लोमा केला. त्यात ती प्रथम क्रमाकाने उत्तीर्ण झाली. (Uma Pendharkar/instagram)
प्रशांत दामलेंकडून उमाला पुरस्कार देखील देण्यात आला होता. आणि तोच क्षण उमाला रंगभूमीवर आणण्यासाठी पुरेसा ठरला. (Uma Pendharkar/instagram)
तिनं ‘संगीत संशय कल्लोळ’ या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. (Uma Pendharkar/instagram)
याखेरीज उमानं सायकॉलॉजीमध्ये मास्टर्स केलं आहे. त्यामुळे ती काऊंसिलिंगचं कामही मोठया जबाबदारीनं करते. (Uma Pendharkar/instagram)
‘अग्गबाई सूनबाई’ ही नवी मालिका येत्या 15 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Uma Pendharkar/instagram)