NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Prabhas: 84 एकरात आहे आलिशान बंगला, आता फार्महाउस बनवतोय प्रभास, खरेदी केली जमीन

Prabhas: 84 एकरात आहे आलिशान बंगला, आता फार्महाउस बनवतोय प्रभास, खरेदी केली जमीन

Prabhas New Farmhouse : Adipurush फेम प्रभासने आपल्या अप्रतिम अभिनयाने भारतीय चित्रपटसृष्टीत एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. तो देशातील सर्वात महागडा स्टार समजला जातो.

16

'आदिपुरुष' फेम प्रभासने आपल्या अप्रतिम अभिनयाने भारतीय चित्रपटसृष्टीत एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. तो देशातील सर्वात महागडा स्टार समजला जातो. आणि त्याच्याकडे नेहमीच मोठमोठे प्रोजेक्टस असतात. प्रभासचे सिनेमेही मोठ्या बजेटमध्ये बनतात आणि खऱ्या आयुष्यातही तो नेहमी काहीतरी मोठं करण्याचा विचार करत असतो. 'बाहुबली'मधून या अभिनेत्याने देशात आणि जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्याच्या चित्रपटानंतर साऊथच्या इतर स्टार्सना पॅन इंडियाचा टॅग मिळाला आहे. बहुचर्चित 'आदिपुरुष'साठी प्रभास आधीच चर्चेत आहे आणि यादरम्यान त्याने नवीन प्रॉपर्टी घेतल्याचं बोललं जात आहे.

26

साऊथमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यासोबतच प्रभास हा भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. तो त्याच्या आलिशान लाईफस्टाईलसाठीदेखील ओळखला जातो. या अभिनेत्याकडे त्याच्या हैदराबादमधील घरासह करोडोंची मालमत्ता आहे.

36

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभासने आता त्याच्या संपत्तीत आणखी वाढ करत एका मोठ्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे. आता सलमान खानप्रमाणेच प्रभासही विश्रांतीसाठी आलिशान फार्महाऊस बांधण्याच्या तयारीत आहे. आपलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, सुपरस्टारने नुकतंच हैदराबादच्या बाहेरील भागात 5 एकरची जमीन खरेदी केली आहे.

46

प्रभासने खरेदी केलेली जमीन आता एक भव्य फार्महाऊस बनणार आहे. जेणेकरुन कामातून वेळ काढून या धावपळीच्या आयुष्यातून थोडी विश्रांती घेता येईल. तसेच अभिनेत्याचा ज्युबली हिल्सच्या पॉश भागात एक आलिशान बंगलादेखील आहे जो फार्महाऊसपेक्षा कमी नाही.

56

तेलुगु 360 मधील एका अहवालात असं म्हटलं आहे की, प्रभासची नवीन मालमत्ता फारच सुंदर आहे. ही जागा एका भव्य टेकडीच्या शिखरावर आहे जिथून संपूर्ण हैदराबाद शहराचं अप्रतिम दृश्य पाहायला मिळतं. येथून सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद घेता येऊ शकतो. प्रभासला त्याच्या खाजगी गोष्टी खाजगीच ठेवणं पसंत पडतं. असं म्हटलं जातं की, प्रभासला दिखावा करणं पसंत नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भीमावरम (फार्महाऊस) मधील प्रभासचं घर 84 एकर जागेवर पसरलेलं आहे. आणि अनेक वर्षांपूर्वी 1.05 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं.

66

रिपोर्ट्सनुसार, प्रभास आपल्या नव्या जागेबाबत फारच सजग आहे. या जमिनीची बारीकसारीक माहितीसुद्धा तो काळजीपूर्वक घेत आहे. शूटिंगमधून मिळेल त्यात वेळी तो या नव्या जागेची पाहणी करत असतो.

  • FIRST PUBLISHED :