लवकरच दिवाळी येत असून सगळीकडे तेजमय वातावरण पहायला मिळत आहे. अनेक कलाकार दिवाळी पार्टी होस्ट करत आहेत. नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनने दिवाळी पार्टी होस्ट केली होती. यामध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. मराठमोळ्या सई ताम्हणकरनही या पार्टीत हजेरी लावली होती.
क्रितीच्या दिवाळी पार्टीतला सईचा लुक समोर आला आहे. सईनं यावेळी काळ्या रंगाच ड्रेस घातला होता. नुकतंच सईनं या ड्रेसमधील फोटो तिच्या इन्स्टाग्रामला शेअर केले आहेत.
सईचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हंटर या चित्रपटातून सईने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर ती 'मिमी' या चित्रपटात झळकली.
'मिमी' या चित्रपटात सईने क्रिती सेननसोबत स्क्रीन शेअर केली होती. त्यामुळे सेटवर दोघींची चांगलीच गट्टी जमली.
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने विविध भूमिका साकारत तिच्या अभिनयाचा ठसा फक्त मराठी मनोरंजनसृष्टीतच नव्हे तर बॉलिवूडमध्येही उमटवला आहे.
‘मिमी’च्या यशानंतर सई पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झाली आहे.‘ग्राउंड झिरो’ या चित्रपटात सई लवकरच दिसणार आहे.
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार असून आता सई ताम्हणकर त्याची साथ देणार आहे. सई ताम्हणकर या चित्रपटात हाश्मी हाश्मीच्या पत्नीची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे.