करवा चौथ हा सण सर्व विवाहित स्त्रियांसाठी खूप खास असतो. त्यात करून पहिल्या करवा चौथचं सेलिब्रेशन तर काही विचारुच नका. 2018-19मध्ये अनेक बॉलिवूड अभिनेत्री विवाह बंधनात अडकल्या. त्यांच्यसाठी यंदाचा करवा चौथ पहिला असणार आहे. जाणून घेऊयात यंदा कोणत्या अभिनेत्री पहिला करवा चौथ साजरा करणार आहेत...
अभिनेत्री प्रियांका चोप्रा अमेरिकन सिंगर निक जोनासशी डिसेंबर 2018 मध्ये विवाहबंधनात अडकली. त्यामुळे प्रियांकाचा हा पहिला करवा चौथ आहे
बॉलिवूडचे बाजीराव-मस्तानी रणवीर-दीपिका हे देखील मागच्या वर्षीच नोव्हेंबरमध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. त्यामुळे दीपिकासाठा यंदाचा करवाचौथ खास असणार आहे.
TMC खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँनं देखील नुकतंच बिझनेसमन निखिल जैनशी लग्न केलं त्यामुळे तिच्यासाठी सुद्धा हा पहिला करवाचौथ असणार आहे.
अभिनेत्री पुजा बात्राचाही लग्नानंतरचा हा पहिला करवाचौथ आहे.
बॉलिवूड गायिका निती मोहन यावर्षीचं लग्नाच्या बेडीत अडकली. तिचाही हा पहिला करवाचौथ असणार आहे.