अभिनेत्री अनुष्का शर्माच्या सोशल मीडियावरील (Social Media) पोस्ट स्टनिंग असतात. तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस नेहमी उतरतात. आता तिने केलेले एक फोटोशूट लॉकडाऊन काळात Beach Vibes देत आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @vogueindia)
अनुष्काने Vogue मॅगझिनसाठी हे फोटोशूट केले आहे. Vogue च्या इन्स्टाग्राम पेजवर तिचे हे बोल्ड फोटो शेअर करण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @vogueindia)
दरम्यान यातील काही फोटो अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील शेअर केले आहेत आणि या फोटोंवर कमेंट केल्याशिवाय विराट कोहलीला राहावलं नाही आहे. अनुष्काने शेअर केलेल्या सर्व फोटोंवर त्याने हार्ट इमोजी पोस्ट केले आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @vogueindia)
विराटने अनुष्काच्या या फोटोंवर हार्ट इमोजी बरोबरच फायर इमोजी आणि हार्यआय इमोजी पोस्टकर, त्याचं तिच्यावर असणारं प्रेम व्यक्त केले आहे (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @vogueindia)
अनुष्का शर्माचे हे फोटो बॉलिवूड सेलिब्रिटींना देखील थक्क करत आहेत. तिचा स्टनिंग बीच लुक पाहिल्यानंतर अनुष्काच्या कमेंट सेक्शनमध्ये अक्षरश: कमेंट्सचा पाऊस पडला आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @vogueindia)
Vogue ने अनुष्काचे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये तिच्या आणि विराटच्या नात्याबद्दल भाष्य केले आहे. अनुष्काने विराटबरोबर तिचं नातं किती जवळचे आहे याबाबत खुलासा केला आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @vogueindia)
Billy Kidd या फोटोग्राफरने अनुष्काचे हे बोल्ड फोटोशूट केले आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @vogueindia)
अनुष्काने या फोटोशूटमधील बिकिनी लुक खूपच बोल्ड आणि सहज पद्धतीने हाताळला आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @vogueindia)
लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियावर समुद्रावरील थ्रोबॅक फोटो शेअर करण्याचा ट्रेंड काही दिवसांपूर्वी चालू होता. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी त्याचे बीच लुक पोस्ट केले होते. या सगळ्यात अनुष्काने केलेले हे फोटोशूट चाहत्यांच्या अधिक प्रतिसाद मिळवत आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @vogueindia)
1 जुलैला तिने या फोटोशूटचा टीजर सोशल मीडियावर शेअर केला होता. तेव्हापासूनच तिचे चाहते या फोटोंसाठी उत्सुक होते. दरम्यान 10 जुलै रोजी हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @vogueindia)
अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या वर्कफ्रंटवर देखील खूप सक्रीय आहे. सध्या तिचं प्रोडक्शन हाऊस क्लीन स्लेट फिल्म्सच्या कामात गुंतून गेली आहे. भाऊ करनेश शर्माबरोबर तिने या प्रोडक्शन हाऊसची सुरूवात केली होती. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @vogueindia)