'बिग बॉस ओटीटी' फेम अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या अभिनयापेक्षा आपल्या अतरंगी लुक्समुळे चर्चेत असते.
सतत उर्फी जावेद कपड्यांचे नवनवीन प्रयोग करत सर्वांनाच थक्क करत असते. यामुळे ती नेहमीच ट्रोलिंगचा सामनाही करते.
दरम्यान उर्फी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी कारण फारच वेगळं आहे. जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
एका अभिनेत्याने उर्फी जावेदवर धक्कादायक आरोप करत खळबळ माजवली आहे.
ई टाईम्सच्या रिपोर्ट्सनुसार, अभिनेता फैजान अन्सारीने उर्फी जावेद तृतीयपंथी असल्याचा दावा केला आहे.
अन्सारीच्या मते उर्फी तृतीयपंथी आहे, नाहीतर ती असे कपडे परिधान करणे शक्यच नाही.
उर्फीविरोधात आपल्याकडे पुरावे असल्याचंही अन्सारीने म्हटलं आहे. उर्फीने स्वतः आपली ओळख उघड करावी. अन्यथा आपण कोर्टात जाऊन असा ईशारा अन्सारीने दिला आहे.
आता या प्रकरणात उर्फी जावेद काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.