अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) बॉलिवूडची एक फेमस फॅमिली आहे. ही फॅमिली आउटिंगसाठी बाहेर पडल्यानंतरही पापारॅझी त्यांचे फोटो काढण्यासाठी तयार असतात. अलीकडेच ही फॅमिली पुन्हा एकदा कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बच्चन कुटुंबीय अलीकडेच नाउट आउटिंगसाठी गेले असतानाचे हे फोटो आहेत.
अभिषेक, ऐश्वर्या आणि त्यांची मुलगीआराध्या बच्चन शनिवारी रात्री मुंबईतील बीकेसी अर्था वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स याठिकाणी स्पॉट झाले. (फोटो सौजन्य- Viral Bhayani)
यावेळी हे तिघेही कॅज्युअल आउटफिट्स दिसले. अभिषेकने यावेळी पर्पल-ग्रे हुडी परिधान घेतली होती. तर ऐश्वर्याने काळ्या रंगाच्या शर्टसह डेनिम जीन्स परिधान केली आहे. आराध्याने निळ्या रंगाचा टीशर्ट आणि डेनिम जीन्स कॅरी केली आहे. (फोटौ सौजन्य- Viral Bhayani)
ऐश्वर्या नेहमी तिच्या मुलीसह असताना तिचा हात हातात घेऊनच सार्वजनिक ठिकाणी जाते. यावेळी देखील दोघी एकमेकींचा हात हातात घेऊन चालत होता. (फोटो सौजन्य- Viral Bhayani)
हे फोटो पाहून आणखी चर्चा होत आहे. यावेळी ऐश्वर्याने सैलसर कपडे परिधान केले असल्याने तिच्या प्रेग्नेन्सीविषयी सोशल मीडियावर चर्चा होत आहे. तिचा लुक पाहून चाहत्यांना ती दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याचे वाटत आहे (फोटो सौजन्य- Viral Bhayani)
हे पहिल्यांदाच नव्हे की ऐश्वर्याच्या प्रेग्नेन्सीबाबत चर्चा झाली आहे. याआधी देखील अशी अफवा अनेकदा समोर आली होती, जी की नेहमी खोटी ठरली आहे. (फोटो सौजन्य- Viral Bhayani)
अलीकडे, एएनआय न्यूजशी संभाषणात अभिषेकने खुलासा केला होता की, ऐश्वर्याने त्याला नकारात्मक कमेंट्सचा सामना करण्यास मदत केली. तो म्हणाला की माझ्या पत्नीने मला सांगितले की तुम्हाला 10,000 सकारात्मक कमेंट्स मिळतात पण एका नकारात्मक कमेंटचा तुमच्यावर परिणाम होतो. तो म्हणाला होता की ऐश्वर्याने त्याला समजावले की तू सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित कर. (फोटो सौजन्य- विरल भयानी)