चुलबुली गर्ल आलिया भट तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. राजी सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावणाऱ्या आलियानं स्टुडंट ऑफ द इयर सिनेमातून तिनं पदार्पण केलं. त्यावेळी 6 महिन्यात तिनं 19 किलो वजन कमी केलं होतं.
अभिनयाच्या बाबतीत आघाडीच्या अभिनेत्रींना टक्कर देणारी आलिया फिटनेसच्या बाबतीत प्रचंड जागरुक आहे. आलिया आठवड्यातून 4 वेळा जिममध्ये जाऊन वर्कआऊट करते. त्यात ती 30 मिनिटं कार्डिओ करते.
आलिया जिमबरोबर योगालाही महत्त्व देते. ती जास्त करून अष्टांग योग करते.
आलियाच्या फिटनेस फंड्यात स्वीमिंग, डान्सिंगही आहे. त्यामुळे तिचं शरीर लवचिक राहतं.
आलिया भरपूर पाणी पिते. आइसक्रीम आणि स्वीट तिचे वीक पाॅइंट्स आहेत. आलिया तीन तीन तासांनी खाणं पसंत करते.
आलिया ब्रेकफास्टला पोहे, अंडी, साखरेशिवाय चहा किंवा काॅफी घेते. त्यानंतर काही तासांनी ती ज्युस, फळं, छोट्या इडल्या आणि सांबार घेते.
दुपारच्या जेवणात डाळ,रोटी,भाज्या असतात. त्यानंतर एखादं फळं. आणि रात्रीच्या जेवणात चिकन, डाळ आणि चपाती, सॅलड खाते.