अभिनेत्री रूपाली भोसलेने आई कुठे काय करते या मालिकेने प्रेक्षकांच्या मानत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तसेच या मालिकेतील संजना दीक्षित म्हणजेच अभिनेत्री रूपाली भोसले सध्या सोशल मिडियावर नेहमी अॅक्टिव असते
नुकतचं रूपाली भोसलेने एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
या फोटोशूटमध्ये तिच्या अदा चाहत्यांना घायळ करत आहेत.
तिच्या या घायाळ करणाऱ्या अदांवर चाहते फिदा झाले आहेत. चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव सुरू आहे.
तिचा हा ग्लॅम अंदाज सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. तिचे फोटो मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत.
रूपाली तिच्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
कसमे वादे, बडी दूर से आये हैं, आयुषमान भव , तेनाली रामा’ या हिंदी मालिकांमध्ये रुपालीने काम केले आहे.
रूपाली भोसलेने तीच्या अभिनयाच्या जोरावर आजवर अनेक जाहिराती आणि चित्रपटांमध्ये छोटे-मोठे पात्र साकारले आहेत.
आई कुठे काय करते या मालिकेत रूपाली जरी संजनाचं नकारात्मक पात्र साकारत असली तरी तिचा चाहाता वर्ग प्रचंड आहे. (फोटो साभार -rupalibhosle instagram)