'आई कुठे काय करते' ही मराठीतील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील कलाकारांना एक नवी ओळख मिळाली आहे.
ही मालिका सतत टीआरपीच्या शर्यतीत पुढे असते. मालिकेत दररोज काही ना काही रंजक घडामोडी घडत असतात.
सध्या मालिकेत ईशा आणि अनिशच्या साखरपुड्याची जोरदार तयारी सुरु आहे. मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे.
आई कुठे काय करते मालिकेत लवकरच प्रसिद्ध अभिनेत्री खुशबू तावडेची एन्ट्री होणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, खुशबू या मालिकेत आशुतोषची बहीण वीणाची भूमिका साकारणार आहे.
खुशबूची भूमिका सकारात्मक आहे की नकारात्मक याबाबत अद्याप काहीही समजलेलं नाहीय.
मात्र आपली आवडती अभिनेत्री आवडत्या ,मालिकेत एन्ट्री घेत असल्याने खुशबूचे चाहते प्रचंड आनंदात आहेत.