'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीची सून अर्थातच अभिनेत्री गौरी कुलकर्णी नेहमीच चर्चेत असते.
नुकतंच मालिकेत गौरीची वापसी झाली आहे. त्यामुळे तिचे चाहते प्रचंड खुश आहेत. परंतु गौरी अरुंधती-आशुतोषच्या लग्नासाठी परतली आहे. ती पुन्हा मालिकेतून रजा घेणार आहे.
दरम्यान गौरीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये अभिनेत्री एका कॅफेत बसलेली दिसून येत आहे. गौरी डेटवर गेलेली दिसून येत आहे.
अभिनेत्रीच्या हातात गुलाबाचे फुल आणि लाल रंगाचे फुगे दिसून येत आहेत. गौरी अगदी रोमँटिक अंदाजात दिसून येत आहे.
फोटो पाहून गौरी खऱ्या आयुष्यात प्रेमात पडलीय की काय? असा प्रश्न अनेकांना पडत आहे.
परंतु अभिनेत्रीची नवी मालिका 'प्रेमास रंग' मधील एका सीनसाठी गौरीने हे फोटो क्लिक केल्याचा अंदाज आहे.
गौरीचे हे फोटो समोर येताच चाहते तुफान प्रतिक्रिया देत आहेत.
'प्रेमास रंग' या नव्या मालिकेत गौरी मुख्य अभिनेत्रीच्या बहिणीच्या महत्वाच्या भूमिकेत झळकत आहे.
गौरी कुलकर्णीला याआधी 'आई कुठे काय करते'मालिकेतून अफाट लोकप्रियता मिळाली आहे.