'आई कुठे काय करते' या मालिकेत सध्या लग्नसराई सुरु आहे. काही दिवसांपूर्वी अरुंधती आणि आशुतोषचा लग्नसोहळा पार पडला होता.
त्यानंतर आता अरुंधतीची मुलगी ईशाचा विवाहसोहळा पार पडणार आहे. लवकरच ईशा आणि अनिश लग्न करणार आहेत.
मालिकेत सध्या ईशा आणि अनिशच्या साखरपुड्याची लगबग सुरु झाली आहे. ईशाला आपले प्रत्येक कार्यक्रम दिमाखात पार पडायला हवे आहेत. त्यासाठी सर्वच कुटुंबीय प्रयत्न करत आहे.
दरम्यान आता या लग्न कार्यात आणखी एक मुद्दा समोर आला आहे. यामध्ये कांचन ईशा आणि अनिशची पत्रिका जुळल्याशिवाय हे कार्य पुढे जाऊ नये असा हट्ट धरताना दिसत आहे.
अशातच अरुंधती समोर आणखी एक आव्हान उभं राहिलं आहे. अरुंधती मात्र पत्रिका जुळवण्याची गरज नसल्याच्या मतावर ठाम आहे.
ती कांचनची समजूत काढत म्हणते, 'पूर्वी लोक अनोळखी मुलांशी मुलींचे विवाह करत असत. त्यामुळे त्यांच्याबाबत कोणालाच फारशी माहिती नसायची. म्हणूनज पत्रिका जुळवून पाहिलं जायचं'.
परंतु आता असं नाही ही मुलं एकमेकांना ओळखतात. एकमेकांचेगून-अवगुण त्यांना ठाऊक आहेत. त्यामुळे पत्रिका जुळवण्याची गरज भासत नाही. तसेच पत्रिका नाही जुळली तर ही मुले कुठे ऐकणार आहेत. ते स्वतःची जबाबदारी स्वतः घेतो म्हणतील. आणि ते बरोबरसुद्धा आहे. त्यामुळे आता मालिकेत कोणता नवा ट्विस्ट येणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.