'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाची घाई दिसून येत आहे.
नुकतंच समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये अरुंधती आणि आशुतोषचा मेहंदी सोहळा सुरु आहे.
देशमुख कुटुंबातील सर्वच सदस्य अरुंधतीसाठी प्रचंड खुश असतात. आणि धम्माल म्हणून मेहंदी सोहळ्यात डान्सही करत असतात.
अशातच अनिरुद्ध याठिकाणी येतो आणि कार्यक्रमात विघ्न आणत गाणी वैगेरे सर्व बंद करुन या आवाजाचा आपल्याला त्रास होत असल्याचं नाटक करतो.
त्यामुळे यश आणि अनिरुद्धमध्ये वाद सुरू होतो. दरम्यान अनिरुद्ध यशवर हात उचलतो.
अरुंधती पुढे सरसावत अनिरुद्धचा हात धरते आणि त्याला असं करण्यापासून रोखते.
या सर्व प्रकारात अरुंधतीच्या हातावर लागलेली आशुतोषच्या नावाची मेहंदी पुसली जाते. त्यामुळे अरुंधतीच्या डोळ्यात अश्रू येतात.
आता मालिकेत पुन्हा कोणता नवा ट्विस्ट येणार? की लग्न व्यवस्थित पार पडणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.