मराठीमध्ये सध्या अनेक वेगळ्या धाटणीच्या मालिका पाहायला मिळत आहेत. त्यामुळे प्रेक्षकसुद्धा मोठी पसंती दर्शवत आहेत. या सर्वांमध्ये कोणत्या मालिका टॉप 10 मध्ये आहेत हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट नुकतंच समोर आला आहे.
या आठवड्यात 'अबोली' ही मालिका दहाव्या स्थानावर आहे.
स्टार प्रवाहवरील 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका सध्या नवव्या स्थानावर आहे.
'स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा' ही मालिका सध्या नवव्या स्थानावरुन आठव्या स्थानावर आली आहे.
झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे.
स्टार प्रवाहावरील 'मुलगी झाली हो' ही मालिका सहाव्या स्थानावर आहे.
अप्पू आणि शशांकच्या आंबट-गोड केमिस्ट्रीमुळे 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका पाचव्या स्थानावर आहे.
सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका चौथ्या स्थानावर आहे.
कीर्तीची आयपीएस आणि प्रेग्नेंसी या ट्विस्टमुळे ही मालिका सध्या तिसऱ्या स्थानावर आली आहे.
आई कुठे काय करते ही लोकप्रिय मालिका दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.
रंग माझा वेगळा ही मालिका पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.