बॉलिवूड आणि क्रिकेट यांचं नेहमीच एक जवळचं नातं आहे. क्रिकेटर्स आणि बॉलिवूड अभिनेत्रींच्या अनेक लव्हस्टोरी आपण वाचल्या आणि पाहिल्या आहेत. गेल्या काही वर्षांत, दोन्ही इंडस्ट्रीतील स्टार्सचे एकमेकांशी संबंध किंवा प्रेमसंबंध सर्रास दिसून येतात.
यापैकी काही जोडपी अशी आहेत की, ज्यांनी एकमेकांना दीर्घकाळ डेट केलं आणि लग्नसुद्धा केलं. तर काही जोडपी अशी आहेत ज्यांनी अनेक वर्षे डेटकरुनसुद्धा एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. या यादीत भारताचा जलद गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री पूजा शरवानी यांचादेखील समावेश होतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री ईशा शरवानी आणि झहीर खान 2005 मध्ये एका कार्यक्रमादरम्यान भेटले होते. झहीर आणि ईशा पहिल्याच भेटीनंतर चांगले मित्र बनले. हळूहळू त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं.
क्रिकेट कारकिर्दीव्यतिरिक्त झहीर खान त्याच्या लव्हलाईफमुळेदेखील चर्चेत होता. झहीर खान आणि ईशा शरवानी 8 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.पण नंतर अचानक विभक्त झाले होते.
या ब्रेकअपनंतर झहीर खानला 'चक दे गर्ल' सागरिका घाटगेमध्ये आपलं खरं प्रेम मिळालं. दुसरीकडे, ईशा शरवानी सिंगल मदर आहे आणि ती आपला मुलगा लुकासोबत आनंदी आहे.
ईशा 'किसना' या सिनेमामुळे चर्चेत आली होती. त्याकाळात ईशाला स्टेडियममध्ये झहीरला चिअरप करताना अनेकवेळा पाहण्यात आलं आहे. शिवाय या दोघांना अनेक पार्टी आणि इव्हेंट्समध्येसुद्धा पाहण्यात आलं आहे.
आठ वर्षाच्या रिलेशनशिपनंतर हे दोघेही लग्नगाठ बांधणार असा सर्वांचा अंदाज होता. मात्र अशातच या दोघांनी ब्रेकअप करत सर्वांना धक्का दिला होता. यांच्या ब्रेकअपचं कारण आजपर्यंत उघड झालं नाहीय.
त्यांनंतर एका मित्राच्या पार्टीत झहीर खानची भेट अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत होती. या दोघांनी अचानक लग्न करत सर्वांना सुखद धक्का दिला होता. सागरिका घाटगे ही कोल्हापूरच्या राजघराण्याची लेक आहे.