पती-पत्नी नातेसंबंधाबाबत एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. एक महिला घरात टीव्ही पाहत असताना पतीच्या कृत्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पती विनोद शर्मा (35) रात्रीच्या वेळी पत्नी नेहा शर्मासोबत बसून टीव्ही पाहत होता.
यादरम्यान काहीतरी घडलं आणि विनोद बाथरूममध्ये गेला. बराच वेळ झाला तरी पती बाहेर आला नाही म्हणून पत्नी बाथरूमच्या दारापाशी गेली.
यावेळी पत्नीने असं काही पाहिलं ती तिच्या तोंडातून शब्दच फुटले नाही.
पती विनोदने बाथरूममध्ये जाऊन गळफास लावला होता. तिने तातडीने त्याला खाली उतरवलं. आणि रुग्णालयात नेलं.
मात्र रूग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ही घटना छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील आहे.
पतीने इतकं मोठं पाऊल का उचललं, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेनंतर पत्नीला जबरदस्त धक्का बसला आहे.