NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / क्राइम / मित्रांना घेऊन प्रेयसीला भेटायला आला, अचानक कारमध्ये बिघाड झाला आणि...

मित्रांना घेऊन प्रेयसीला भेटायला आला, अचानक कारमध्ये बिघाड झाला आणि...

देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीला भेटण्यासाठी कारमधून 3 तरुण आले होते. मात्र, कारमधील डिझेल संपल्यावर त्यांनी पेट्रोल पंपावर 94 लीटर डिझेल भरत तिथून पोबारा केला. (अनूप पासवान, प्रतिनिधी)

17

छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील कटघोरामध्ये चोरीची एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे तीन तरुण आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी कारमधून आले होते. प्रेयसीला भेटल्यानंतर कारचे इंधन संपल्याने तिघे तरुण कुसमुंडा येथे परतले.

27

त्यानंतर ते पेट्रोल पंपावर पोहोचले आणि गाडीच्या टाकीमध्ये आणि वेगळ्या डब्ब्यामध्ये सुमारे 94 लिटर डिझेल भरून पंप कर्मचाऱ्याला चकमा देऊन पळून गेला. यानंतर पंप कर्मचार्‍याने तात्काळ माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून कार चालकाला ताब्यात घेतले. यावेळी त्यांचे अन्य दोन साथीदार फरार झाले. पोलीस दोन्ही तरुणांचा कसून शोध घेत आहेत.

37

मिळालेल्या माहितीनुसार, जांजगीर-चंपा जिल्ह्यातील बरद्वार गाव रेडा येथे राहणारा अखिलेश यादव (23 वर्षे) हा मंगळवारी त्याच्या दोन मित्रांसह त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी त्याच्या कारमधून कटघोरा येथे पोहोचला होता. प्रेयसीला भेटल्यानंतर तिघेही पहाटे तीन वाजता कुसमुंडा येथे पोहोचले तेव्हा त्यांच्या गाडीचे इंधन संपले.

47

त्यांनी कुसमुंडा येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर पोहोचून कारच्या टाकीमध्ये आणि वेगळ्या डब्ब्यामध्ये सुमारे 94 लिटर डिझेल भरले आणि भरधाव वेगाने कार चालवत अखिलेश तेथून पळून गेला.

57

पंपावरील कामगाराने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला. यावेळी आरोपी तरुणांनी नियोजनबद्ध पद्धतीने कारची नंबर प्लेटही बदलल्याचे सांगण्यात येत आहे.

67

पंप कर्मचाऱ्यांनी कुसमुंडा पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी नाकाबंदी करून गाडी चालवणाऱ्या अखिलेश यादवला ताब्यात घेतले. तसेच पोलिसांनी कारही ताब्यात घेतली आहे. यादरम्यान कारमध्ये असलेले अखिलेशचे दोन्ही मित्र तेथून पळून गेले.

77

दोन्ही फरार तरुणांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. अखिलेश यादव आणि इतरांविरुद्ध कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

  • FIRST PUBLISHED :