महू-मंडलेश्वर राज्यमार्गावर गुरुवारी घाट सेक्शनमध्ये सेल्फी घेत असताना एक महिला 1000 फूट खोल दरीत पडली. यानंतर जागीच तिचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी साधारण 11 वाजता पती आणि मुलांसह ती फिरण्यासाठी आली होती.
येथील जाम गेट हा भाग फिरल्यानंतर थोडं खाली उतरुन घाट सेक्शनमध्ये सेल्फी घेण्यासाठी थांबले. तेव्हा हा अपघात घडला. मंडलेश्वर ठाण्याचे प्रभारी संतोष सिसोदिया यांनी सांगितले की, 28 वर्षीय मृत महिला नीतू ही इंदूर येथील राहणारी आहे. ती पती विकास बाहेती आणि 5 वर्षीय मुलासोबत फिरायला आली होती. साधारण 11.30 वाजता गेटहून थोडं खाली घाट सेक्शनमध्ये सेल्फी घेण्यासाठी हे तिघे थांबले.
सेल्फी घेत असताना नीतूचा पाय सरकला आणि ती 1000 फूट खोल दरीत कोसळली. डोकं, हात-पाय आणि मानेला गंभीर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला.
नीतूचे वडील अजब सिंह चौहान हेदेखील इंदूरचे राहणारे आहेत. त्यांनी सांगितले की, मुलीचा प्रेमविवाह झाला होता. विकास काय काम करतो याबद्दल माहीत नाही. मुलीच्या अपघाताची माहिती मिळता ते घटनास्थळी आले. पोलिसांनी सांगितले की, नीतूचा पती विकास एका खासगी कंपनीते काम करतो.
जाम गेटचा सुरक्षारक्षक सहदेव गीरवाल याने सांगितले की, ही घटना साधारण 11.45 मिनिटांनी झाली. सूचना मिळताच पोलिसांची टीम आणि स्थानिक नागरिक डोंगरामध्ये नीतूला शोधू लागले. कालांतराने जखमी अवस्थेत नीतूचा मृतदेह सापडला.