NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / क्राईम / Live in पार्टनरने केला घात; 48 दिवसांनंतर स्वीटी पटेलच्या हत्येचं गूढ उलगडलं

Live in पार्टनरने केला घात; 48 दिवसांनंतर स्वीटी पटेलच्या हत्येचं गूढ उलगडलं

जेव्हा स्वीटी बेपत्ता झाली तेव्हा ती 6 महिन्यांची गर्भवती होती.

16

स्वीटी पटेल यांच्या हत्येप्रकरणी अहमदाबाद गुन्हे शाखेने पीआय अजय देसाई आणि त्याचा साथीदार किरीट सिंह जडेजा याला अटक केली आहे. काल गुन्हे शाखेने सांगितले की, अजय देसाई यांनी कर्टीनजीक अटाली येथील हॉटेल वैभव येथे स्वीटी पटेल यांचा मृतदेह जाळला. तपासणीत असंही आढळून आलं आहे की, स्वीटी पटेल हिची हत्या करण्यात आली होती आणि देसाई यांनी किरीटसिंग यांना खोटं बोलून विश्वासात घेतलं होते. किरीटसिंग जडेजा हेदेखील अजय देसाई यांच्या कृत्यामध्ये भागीदार झालयाचं गूढ समोर आलं आहे.

26

यापूर्वी अजय देसाई यांचं लग्न झालं होतं. पहिल्या घटस्फोटानंतर तो स्वीटीबरोबर लिव्ह इनमध्ये राहत होता. दुसरीकडे स्वीटी पटेलचाही पहिला घटस्फोट झाला होता. यादरम्यान अमेरिकेतील एका व्यक्तीशी तिचे संबंध असल्याचे एका तपासणीत समोर आले आहे. स्वीटी पटेल आणि अजय देसाई यांच्यामध्ये बरेच वाद होते. मात्र सुरुवातील सर्व ठीक होतं. स्वीटीने गर्भवती असल्याचं सांगितल्यानंतर वाद वाढू लागला. स्वीटी त्याला लग्न करण्याबद्दल सांगत होती. ज्यानंतर दोघांमध्ये भांडण झालं. त्यात देसाई यांनी स्वीटीची हत्या करण्याचा कट रचला होता.

36

देसाईने स्वीटीला ठार मारण्याचा कट रचला आणि किरीट सिंगला सांगितले की, कुमारी बहिण गर्भवती असताना घरात ठेवली जात नाही, म्हणून त्याने तिला ठार मारले. मृतदेहाच्या विल्हेवाट लावण्यासाठी त्याने किरीटसिंहला मदतीला घेतलं. स्वीटी पटेल हरवलेली नसून तिला ठार मारण्यात आलं होतं आणि देसाईने तिचा मृतदेह कोणालाही न सांगता जाळला होता. 

46

56

अजय देसाई यांनी किरीटसिंग याला विश्वासात घेतले. स्वीटीचा मृतदेह जडेजाच्या हॉटेलमध्ये नेला. तेथेच स्वीटीला जाळण्यात आलं. त्यानंतर तिची हाडंदेखील हॉटेलच्या आजूबाजूच्या परिसरात फेकून देण्यात आली.

66

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय गेल्या अनेक वर्षांपासून स्वीटीसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. गेल्या 48 दिवसांपासून बेपत्ता झालेल्या स्वीटीचा शोध सुरू होता. तिच्या व़डिलांनी स्वीटी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

  • FIRST PUBLISHED :