NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / क्राईम / धक्कादायक! शॉर्टकटमध्ये पैसे कमावण्यासाठी सैनिकच बनले अफू तस्कर, सैन्यातील नायब सुभेदारासह तिघांना अटक

धक्कादायक! शॉर्टकटमध्ये पैसे कमावण्यासाठी सैनिकच बनले अफू तस्कर, सैन्यातील नायब सुभेदारासह तिघांना अटक

न्यायालयानं तिन्ही सैनिकांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर नायब सुभेदार करणाराम सहा दिवसांच्या पोलीस रिमांडमध्ये असणार आहेत.

15

कमी वेळेत जास्त पैसा मिळवण्याच्या हव्यासापोटी तीन सैनिकांनी चक्क अफू तस्करीचं काम सुरू केलं. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसही चक्रावून गेले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून साडेतीन किलो अफू जप्त केला असून तीन सैनिकांसह सहा जणांना अटक केली आहे. स्थानिक पोलीस पुढील तपास करत आहेत.

25

हरियाणाच्या कैथलमध्ये अफूच्या व्यसनाचं सुरूअसलेलं काळबेरं पोलिसांनी बाहेर काढलं आहे. या तस्करीच्या रॅकेटमध्ये सीआयए -2 पोलिसांनी तीन सैनिकांसह सहा जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे 22 डिसेंबर रोजी रात्री कैथल-संगतुपरा रोडवर वेर्ना गाडीतून साडेतीन किलो अफू जप्त केला आहे.

35

यावेळी पोलिसांनी तीन तस्करांना अटक केली आहे. यांच्याकडे चौकशी केली असता असं आढळून आलं की, त्यांचे नातेवाईक जे सैनिकांत आहेत, ते राजस्थानातून अफू आणून त्यांना येथे पुरवत असत. जप्त केलेल्या अफूची किंमत अंदाजे साडेपाच लाख रुपये इतकी सांगितली जात आहे. ही तीच गाडी आहे. ज्यातून अफूची तस्करी केली जात होती.

45

पोलिस अधीक्षक (एसपी) लोकेंद्र सिंह यांनी सांगितलं की, गुरप्रीत, कर्मजीत आणि रवींद्रपाल यांना अटक केली असून तिघेही पटियाला येथील रहिवासी आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी राजस्थानातील नसीराबाद येथे नियुक्त असलेल्या तीन सैनिकांना अटक केली आहे. या सैन्यांमध्ये नायब सुभेदाराचाही समावेश आहे. राजस्थानातून अफू आणून पंजाबमध्ये राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना पुरविल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

55

या तिघांनाही सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयानं तिन्ही सैनिकांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर नायब सुभेदार करणाराम यांना सहा दिवसांचा पोलीस रिमांड देण्यात आली आहे.

  • FIRST PUBLISHED :