NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / क्राईम / धक्कादायक! रुग्णालयात कुत्रा कुरतडत राहिला मुलीचा मृतदेह; नागरिक VIDEO करण्यात होते दंग

धक्कादायक! रुग्णालयात कुत्रा कुरतडत राहिला मुलीचा मृतदेह; नागरिक VIDEO करण्यात होते दंग

एका रस्ते अपघातात एका 13 वर्षीय मुलीचा अपघात झाला होता

15

रुग्णालय परिसरात स्ट्रेचरवर ठेवलेल्या मुलीचा मृतदेह कुत्रा खात होता. हे हृदयविदारक दृष्य पाहून रुग्णालयातील लोकांना जबरदस्त धक्का बसला. काही लोकांनी मोबाईलवरून याचा व्हिडिओ बनवला. त्याचबरोबर सीएमओने या प्रकरणी त्वरित चौकशीचे आदेश दिले आहेत.

25

संभलच्या दिडोली येथे आदल्या दिवशी रस्ते अपघात झाला होता. ज्यामध्ये 13 वर्षीय रिंकी हिचा मृत्यू झाला. तर तिचा भाऊ पवन यामध्ये गंभीर जखमी झाला. भाऊ-बहिणी दुचाकीवरून पेट्रोल घेण्यास जात असताना हा अपघात झाला.

35

अपघातानंतर दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी रिंकू हिला मृत घोषित केलं, तर पवनवर उपचार सुरू आहेत.

45

पवनची प्रकृतीही अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. घरातील सर्व लोक मुलाच्या देखरेखीसाठी गुंतले होते. त्याच वेळी, रिंकीचा मृतदेह रुग्णालयाच्या आवारात एका स्ट्रेचरवर ठेवण्यात आला. मुलीच्या मृतदेहाजवळ त्यावेळी कोणी नव्हते. त्याचवेळी हॉस्पिटलमध्ये फिरत असलेल्या भटक्या कुत्र्यांनी मुलीचं शरीर कुरतडायला सुरुवात केली. तिथे उपस्थित लोकांनी याचा व्हिडीओ केला. तर काही लोकांनी मुलीच्या मृतदेहापासून कुत्र्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. याबाबत माहिती मिळताच मुलीचे कुटुंबीय घटनास्थळी आले.

55

या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सीएमओ अमिता सिंह यांनी सांगितलं की, या प्रकरणाचा तपास केला जात आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.

  • FIRST PUBLISHED :