NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / क्राईम / धक्कादायक! मुलाच्या एका निर्णयामुळे आई-बापाचा गेला जीव; राहत्या घरातच घेतला गळफास

धक्कादायक! मुलाच्या एका निर्णयामुळे आई-बापाचा गेला जीव; राहत्या घरातच घेतला गळफास

बदनामी होईल या भीतीने या दाम्पत्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.

15

आपला मुलगा एका विवाहित महिलेला घेऊन पळाला ही बाब त्याच्या आई-वडिलांना सहन झाली नाही. मुलाच्या अशा वागणुकीमुळे ते दोघेही अस्वस्थ होते. त्यातच त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचलत स्वत:ला संपवलं. ही घटना राजस्थानातील जोधपूर जिल्ह्यातील आहे.

25

शहरांमध्ये अनलॉक प्रक्रियेबरोबरच आत्महत्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशातच जोधपुरमध्ये घडलेला प्रकार बैचेन करणारा आहे. येथे एका खोलीत दाम्पत्य छताला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले. रविवारी सकाळी या दाम्पत्याने आत्महत्या केल्याची बाब समोर आली.

35

रविवारी सकाळी त्यांच्या कुटुंबीयांनी दरवाजा वाजवला तेव्हा आतून उत्तर आलं नाही. त्यानंतर खिडकीतून पाहिलं तर दोघे पती-पत्नी गळफास लावलेल्या अवस्थेत दिसत होते.

45

यानंतर तातडीने त्यांनी आजूबाजूंच्या लोकांसह पोलिसांना माहिती दिली. घरातील पती-पत्नीच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. तातडीने त्यांचे मृतदेह रुग्णालयात हलविण्यात आले. जेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

55

प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, मृत विष्णू दत्त आणि त्यांची पत्नी मंजू देवी गेल्या काही काळापासून मानसिक तणावात होत्या. त्यांच्या मुलाने काही दिवसांपूर्वी एका विवाहित महिलेला पळवून आणलं होतं. त्यामुळे दोघेही मानसिक तणावात होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.

  • FIRST PUBLISHED :