पुण्यातून गेल्या काही दिवसांपासून यामाहा कंपनीच्या आणि त्याही फक्त RX 100 मॉडेलच्या गाड्या चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलं होतं.
ऐंशी आणि नव्वदच्या दशकात लोकप्रिय ठरलेल्या या गाड्यांना आज देखील मोठी मागणी असून हौशी लोक लाखो रुपयांना या गाड्या खरेदी करतात.
हीच गोष्ट लक्षात घेऊन पुण्यातील दोन तरुणांनी शहरातून या गाड्या चोरण्याचा सपाटा लावला होता.
पोलिसांनी शहरातील तब्बल 100 ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमरेमधील फुटेज तपासून या आरोपींपर्यंत पोहचण्यात यश मिळवलं आहे.
या आरोपींनी अशा 20 यामाहा आरएक्स हंड्रेड गाड्या चोरल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी 16 गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. विश्रामबाग पोलिसांनी ही कामगिकी केली आहे.