NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / क्राईम / घटस्फोटीत शिक्षिका 11 वीच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांनी अटक केल्यानंतर धक्कादायक खुलासा

घटस्फोटीत शिक्षिका 11 वीच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांनी अटक केल्यानंतर धक्कादायक खुलासा

काही दिवसांपूर्वी घरी ट्यूशनसाठी येणाऱ्या 11 वीच्या मुलाला घेऊन फरार झाली होती.

16

अनेकदा शाळांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये अफेअरच्या बातम्या चर्चेचा विषय बनतात. मात्र येथे शाळेतील एका शिक्षिकेने असा काही कारनामा केला आहे, त्यामुळे ती चर्चेत आली आहे. एक महिला शिक्षिका 11 वीच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार झाली होती, त्यानंतर हा खुलासा झाला.

26

ही घटना हरियाणातील पानीपत येथील आहे. येथे एक महिला शिक्षिका घरात एकटीच राहत होती. तिच्या घरी एक अल्पवयीन मुलगा शिकवणीसाठी येत होता. दरम्यान महिला शिक्षिका मुलाच्या प्रेमात पडली. आणि मग असं काही झालं की ज्याचा आपण विचारही करू शकत नाही.

36

महिला अल्पवयीन मुलाला घेऊन फरार झाली. मुलगा बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या पालकांनी महिला शिक्षिकेविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांची टीम सक्रिय झाली. त्यानंतर पोलिसांनी दोघांचाही तपास सुरू केला होता.

46

पानीपत पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने महिला शिक्षिकेला अल्पवयीन मुलासोबत पकडलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे. सोबतच महिला शिक्षिकेची काऊन्सिलिंगदेखील केलं जात आहे. मुलाचं अपहरण करण्यामागे तिचा उद्देश काय होता?

56

सांगितलं जात आहे की, ही महिला विद्यार्थ्याची क्लास टीचर आहे आणि एका खासगी शाळेत शिकवते. मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्राक नोंदविल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं की, 29 मे रोजी दुपारी साधारण 2 वाजता मुलगा शिक्षिकेच्या घरी गेला होता. मात्र परतलाच नाही.

66

पानीपतच्या देशराज कॉलनीमध्ये एक खासगी शाळेत शिकवणारी ही शिक्षिका घटस्फोटीत आहे. मुलाच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांचा मुलगा ट्यूशनसाठी शिक्षिकेच्या घरी गेला होता, मात्र तो परतलाच नाही.

  • FIRST PUBLISHED :