नवी मुंबईतून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
नवी मुंबईतील उलवे मधील एका तरुणीने मुलाला जन्म देताच त्याचा जीव घेतला. या घटनेनं सध्या सगळीकडे खळबळ उडाली आहे.
19 वर्षीय अविवाहित तरुणीने प्रेम प्रकरणातून एका मुलाला जन्म दिला होता.
मात्र काही वेळातच त्या अविवाहित तरुणीने जन्मजात मुलाला इमारतीच्या खाली फेकून दिले.
तिने रूमच्या शौचलयाच्या खिडकीतून जन्मलेल्या बाळाला खाली फेकले.
इमारतीच्या रहिवाशांनी या घटनेची तक्रार करताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी तपास करताच 19 वर्षीय अविवाहित आईने हा सर्व प्रकार केल्याचं उघडकीस आलं.
पोलिसांनी 19 वर्षीय अविवाहित आईवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.