NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / क्राइम / स्कर्ट घाल, दारू पी, सिगारेट ओढ; तरुणी म्हणते असं सासर नको गं बाई, शेवटी...

स्कर्ट घाल, दारू पी, सिगारेट ओढ; तरुणी म्हणते असं सासर नको गं बाई, शेवटी...

पती पत्नीच्या वादाच्या अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत असतात. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रुकैया हिचे लग्न 2015 मध्ये दिल्लीतील रहिवासी अमीरुद्दीनसोबत झाले होते. हा विवाह दिल्लीतील एका मोठ्या फार्म हाऊसमध्ये हुंडा देऊन पार पडला. मात्र, लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांतच रुकैया पती आणि सासरच्या मंडळींकडून कंटाळली. रुकैया मॉडर्न मुलगी बनू शकली नाही, हे यामागचे मुख्य कारण होते.

17

रुकैया हिचा नवरा, दीर आणि सासरे तिला आधुनिक मुलगी म्हणजे मॉडर्न मुलगी म्हणून मिनी स्कर्ट आणि शॉर्ट कपड्यांमध्ये राहण्याची सक्ती करायचे. तसेच रुकैयाला दारूचे पॅक बनवून तिला पिण्यासाठी बळजबरी करायचे. इतकेच नाही घरी आलेल्या सर्व महिला आणि पुरुषांसोहत खुलेआम भेटण्यासाठी तिच्यासाठी दबाव टाकण्यात आला.

27

बाहेरच्या हायप्रोफाईल पार्ट्यांमध्येही ती त्याच युरोपियन शैलीत मॉडर्न मुलगी म्हणून जावे, यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात होता. पण तिला हे सर्व आवडत नव्हते. रुकैय्या या सासरच्या घरात याला सतत विरोध करत असे, पण पतीने घरात इतर मुलींसोबत दारूची पार्टी सुरू केल्यावर हद्दच झाली. पत्नीने याला उघडपणे विरोध केल्यावर घरात अनेकदा भांडण झाले.

37

रुकैयाने जेव्हा पतीची म्हणणे मानण्यास स्पष्टपणे नकार दिला तेव्हा तिच्या सासरच्यांनी तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी रुकैया गंभीररीत्या भाजली होती. आजूबाजूच्या लोकांनी या घटनेची माहिती दिल्ली पोलिसांना दिली. त्यानंतर रुकैयाला दिल्लीतीलच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नंतर कुटुंबाच्या त्रासामुळे रुकैयाने सासरच्या ठिकाणाहून स्वतःहून दरभंगा गाठले.

47

यानंतर तिने 2021 मध्ये दरभंगाच्या महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. एफआयआर दाखल झाल्यानंतर दरभंगा पोलिसांनी तपास सुरू केला, सत्य समोर आले. त्यानंतर महिला ठाण्याच्या पोलिसांनी आरोपी पती अमीरोद्दीनसोबतच महिलेच्या दीर ताहिर हुसैन याला दिल्लीतून अटक करून दरभंग्यात आणले.

57

रुकैया या महिलेचा दीर ताहिर हसन हा इंटरनॅशनल टॅटू मॅन म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्याच्या संपूर्ण शरीरावर टॅटू आहेत. मोठ्या उच्च कुटुंबांशीही त्याचा संपर्क आहे. त्यांच्या टॅटूमुळे तो भारतात आणि परदेशात ओळखला जातो. अशी शेकडो टॅटू फोटोही त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहेत.

67

पीडितेचा काका इझहर आलम मुन्ना यांनी सांगितले की, कुटुंबातील पहिल्या मुलीचे लग्न झाले होते. या लग्नामुळे संपूर्ण कुटुंब खूप आनंदी होते. मुलीच्या सुखासाठी मौल्यवान जमीन विकून दिल्लीसारख्या ठिकाणी फार्म हाऊस बुक करून मुस्लिम रितीरिवाजांनुसार थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. लाखो रुपयांशिवाय 30 ते 40 तोळे सोने आणि एक कारही हुंडा म्हणून देण्यात आली. पण मुलाचे कुटुंब चारित्र्यहीन निघाले.

77

तो आमच्या मुलीला लहान कपडे घालायला सांगायचा. त्याला आमच्या मुलीला यूरोपियन कल्चरमध्ये ठेवायचे होते. पण सुसंस्कृत समाजात वाढलेल्या माझ्या मुलीने त्याला विरोध केला. तिने विरोध केला तर तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केला गेला. आता फक्त मुलीच्या न्यायासाठी लढा द्यायचा आहे. त्यांनी सांगितले की संपूर्ण कुटुंब गोंधळलेले आहे. ते केवळ मुलींचा सौदाच करत नाहीत तर मोठ्या ठिकाणी मुलीही पुरवतात. याप्रकरणी दरभंगा पोलीस पुढील तपास करत आहे.

  • FIRST PUBLISHED :