नाव बालाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव : अवैध पद्धतीनं सुरू असलेल्या गांजाची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
तेलंगणा पोलिसांनी आंध्र प्रदेश येथून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. प्रकरणातील तेलंगणा पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील चौघासह एकूण सहा जणांना अटक केली.
धक्कादायक बाब म्हणजे या आंतरराज्य गांजा तस्करीमध्ये धाराशिव पोलीस दलातील परंडा येथील एक हेड कॉन्स्टेबल समावेश असून या रॅकेटचा मोरक्या भूम मधील असल्याची माहिती समोर येत आहे.
तेलंगणा पोलिसांनी या कारवाईत दोन कारमधून तब्बल दोनशे किलो गांजा जप्त केला. ज्याची बाजारातील किंमत 34 लाख असून तो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे
या कारवाई पोलिसांचा सहभाग असल्याने धाराशिव जिल्ह्यात एक मोठी खळबळ माजली असून या गांजा तस्कराचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता होताना दिसत आहे