NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / क्राइम / नोकरीबद्दल जाहिरातीच्या लिंकवर क्लिक करताय तर सावधान! अशी होते फसगत PHOTOS

नोकरीबद्दल जाहिरातीच्या लिंकवर क्लिक करताय तर सावधान! अशी होते फसगत PHOTOS

ऑनलाईन शॉपींग आणि व्यवहारातून काही लोकांची फसगत होते. ही फसगत झाल्यानंतर अनेकांना काय करायचं हे समजत नाही.(साकेत सिंग)

15

सध्या ऑनलाईनचा जमाना सुरू असल्याने आपण कुठेही कसलाही व्यवहार करत असलो की पहिला ऑनलाईन सुविधा आहे का याचा विचार करतो. परंतु या ऑनलाईन शॉपींग आणि व्यवहारातून काही लोकांची फसगत होते. ही फसगत झाल्यानंतर अनेकांना काय करायचं हे समजत नाही. दरम्यान मुंबईतील अंधेरीत एकाची फसगत झाल्याची माहिती समोर आली आहे. फेसबुकवर amazon मध्ये जॉब असल्याचे भासवून फसवण्यात आले आहे.

25

मुंबईतील अंधेरीमध्ये राहणाऱ्या 33 वर्षीय व्यक्तीसोबत ही घटना घडली आहे. या व्यक्तीने फेसबुकवर जाहिरात पाहून तिथे अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून मेरी नावाच्या महिलेचा व्हॉट्सअॅप नंबर मिळवला. या महिलेने आपण मॅनेजर असल्याचे भासवून त्याला जाळ्यात ओढले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाळ्यात ओढलेल्या महिलेने part time आणि full time जॉब विषयी माहिती दिली.

35

यानंतर कामाचे स्वरूप सांगून महिलेने त्याला लिंक पाठवून काम सुरू करण्यासाठी काही लिंक दिल्या आणि यानंतर पीडितेला 200 रुपयांचे रिचार्ज करून उत्पादन खरेदी करण्यास सांगितले. हा टास्क पूर्ण केल्यावर पीडितेला ई-वॉलेटमध्ये 450 रुपये मिळाले. हळूहळू महिलेने पीडितेचा विश्वास जिंकला आणि काही दिवसात त्या व्यक्तीला सुमारे 2 लाख 40 हजार रुपये खर्च करण्यासा भाग पाडले. या बदल्यात त्याला 5 लाख रुपये मिळाले. परंतु जेव्हा पीडितेने त्याच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या खात्यातील सगळेच पैसे गेल्याची माहिती समोर आली.

45

याबाबत पीडितेने मॅनेजरला विचारणा केली असता पैसे मिळवण्यासाठी 20 टक्के कर भरावा लागेल, असे उत्तर दिले. त्याशिवाय निधी उपलब्ध होणार नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम देण्यासाठी त्या व्यक्तीकडे पैसे नव्हते.

55

अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने घरातील सोने विकून 1लाख 2 हजार रुपये कर जमा केला. परंतु, कराचे पैसे भरल्यानंतरही, पीडितेने त्याच्या ई-वॉलेटमधून बँक खात्यात पैसे हस्तांतरित केले नाहीत. नंतर त्याचे खातेही निष्क्रिय करण्यात आले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्याची फसवणूक झाली आहे. यानंतर पीडितेने तक्रार दाखल केली. पोलीस अधिक तपास करत आहेत.

  • FIRST PUBLISHED :